पनवेल महानगरपालिका जनसंपर्क कक्ष कामोठेतील नागरी आरोग्य केंद्रात विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन
पनवेल दिनांक 10 : कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्नात पनवेल महापालिका यश स्वी होत आहे. वेळोवेळी आयुक्त साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे कारोना सारखी महामारी आटोक्यात आणणे शक्य झाले. भविष्यात येणाऱ्या रोगांवर मात करण्यासाठी वैद्यकिय सेवा बळकट करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महापौर डॉ.कविता चौतमोल यांनी कोमोठे येथील नागरी सुविधा केंद्र येथे झालेल्या वैद्यकिय सेवांच्या उद्घाटनावेळी केले.
गोरगरीबांना कमी खर्चात उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिका बाहेरच्या संस्थांना सोबत घेऊन चांगल्या सुविधा देत आहेत. तेरणाने यामध्ये सकारात्मक सहभाग घेतला आहे.पुढे जाऊन तेरणा आणि मनपाचे घट्ट नाते निर्माण होईल. असे प्रतिपादन मा. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यावेळी केले.
पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्र याठिकाणी तेरणा वैद्यकिय महाविद्यालय आणि महापालिका यांच्य संयुक्त विद्यमानातून स्त्री रोग, बालचिकित्सा,त्वचारोग, अस्थी व्यंग चिकित्सा, फिजि ओथेरपी, नेत्र चिकित्सा,औषधे, शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी तेरणा वैद्यकिय महाविद्यालयाचे विश्वस्त मा. मल्हार पाटील, सीईओ डॉ.पी.टी. देशमुख, डीन डॉ.सुनिल पेटकर, नमन गर्ग, डॉ.पद्मजा कांची, डॉ.राहुल दांडेकर, नगरसेवक अरूण भगत, नगरसेविका संतोषी तुपे, नगरसेविका अरुणा भगत ,मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. लोहारे, डॉ. रेहाना मुजावर आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि तेरणा महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.