तळोजा येथे औद्योगिक वसाहती मधे लॅपटॉपची चोरी
पनवेल दि.14 (वार्ताहर)- अज्ञात चोरट्यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या उघड्या केबिनमध्ये प्रवेश करून लॉक नसलेल्या लोखंडी कपाटात ठेवलेला 10 हजार रूपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.
रिसीनॅश ऑईलमिल लि. प्लॉट नं-एच22 तळोजा औद्योगिक वसाहत याकंपनीच्या उघड्या केबिनमध्येअज्ञात चोरट्यांनी प्रवेश करूनलॉक नसलेल्या लोखंडी कपाटात ठेवलेला 10 हजार रूपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे.याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.