पोलिस असल्याची बतावणी करून वडापाव विक्रेत्यास लुटले
पनवेल दि.14 (वार्ताहर)- पोलिस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी वडापाव विक्रेत्यास लुटल्याची घटना पनवेल जवळील नॅशनल हॉटेलसमोर घडली आहे.
दिपक जाधव (वय-37) हे तळोजा फेज-1 मधून तळोजा गाव येथे मोटारसायकलने जात असताना दोन अनोळखी इसम मोटारसायकलीवरून त्याठिकाणी आले व त्यांनी दिपक जाधव यांची गाडी थांबवून आम्ही पोलिस आहोत, तुम्ही हेलमेट व मास्क घातला नाही असे सांगून तुम्ही गळ्यातील सोन्याची चेन काढून कागदात बांधून ठेवा असे त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून 15 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हातचलाखीने अज्ञात इसमाने स्वतःकडे ठेवून घेतली व कागदात दगड ठेवून तो जाधव यांच्या हाती देऊन तो तेथून पसार झाला. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.