ऑल इंडिया सीफेअर्स आणि जनरल वर्कर्स युनियनने त्यांच्या बहुप्रतिक्षित युनियन ध्वजाचे अनावरण
पनवेल/प्रतिनिधी: आज 15 फेब्रुवारी 2021 रोजी ऑल इंडिया सीफेअर्स आणि जनरल वर्कर्स युनियनने त्यांच्या बहुप्रतिक्षित युनियन ध्वजाचे अनावरण केले, त्याचे भगवा रंग एक सकारात्मक ऊर्जा देते. ध्वजांच्या शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा लोगो विराजमान असून त्यांना आशीर्वाद देत असल्याचे भासते, मध्यवर्ती भागात सर्व सीफेरर्स आणि जनरल कामगारांचा अभिमान असणार यूनियनचा लोगो दिसून येतो.
युनियनच्या ध्वजा अनावरणाच्या समयी अध्यक्ष संजय व्ही. पवार, कार्यकारी अध्यक्ष श्री. अभिजित डी. सांगले, उपाध्यक्ष श्री. संग्राम सोंडगे, उपाध्यक्ष कु. समिष्ठा चौधरी, सरचिटणीस श्री. अफजल देवळेकर सरकार, अध्यक्ष (फिशरमेन सेल) कु. शितल एस. मोरे आणि सर्व प्रतिष्ठित युनियन सदस्य उपस्थित होते.