स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना पनवेलतर्फे हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारकाचा समाजासाठी वापर करण्याची मागणी
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक परिसराचा वापर समाजाच्या उपयोगासाठी करावा अशी मागणी आज स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना पनवेलतर्फे पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची भेट घेवून करण्यात आली.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सुरेंद्र गोडबोले, बबन जगनाडे, श्याम वालावलकर व यतीन ठाकूर आदी उपस्थित होते. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेलच्या मध्यवती ठिकाणी असलेल हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक, हे पनवेलची एक ऐतिहासिक ओळख आहे. परंतु आज तेथे कायम स्वरुपी ब्रम्हकुमारी परीवाराचे लोक वावरतात, त्यांचे कार्यकम करतात व बदल्यात ते उद्यान मेंटेन करतात. उद्यानात आठवड्यातून दोन दिवस त्यांचा समुपदेशनाचा कार्यकम असतो, त्यांचा समुपदेशनाचा कार्यकम जेंव्हा असतो तेंव्हा ते स्मारकाच्या आत असणारे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक व इतर काही फोटो काढून ठेवतात व 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, कांती दिन या दिवशी जेंव्हा महानगरपालिकेचे कार्यकम असतात तेंव्हा ते फोटो पूर्ववत लावतात. जो त्यांना कोणताही अधिकार नाही. हे स्वतंत्रता सेनांनीचे स्मारक असल्या मुळे त्याचा मुळ ऊद्देश साध्य होतांना दिसत नाही. केवळ ब्रम्हकुमारी देखभाल करतात म्हणुन त्यांचाच वावर तेथे असावा हे पटत नाही. तरी महानगरपालिकेने या वास्तूचा उपयोग स्मारका मध्ये छोटी प्रदर्शन भरवणे (बेलापुर येथील अरबन हट) प्रमाणे, बचत गट, आदिवासी वस्तु विकी यांसाठी स्मारकाची बाहेरील जागा अल्प दरात भाड्याने देणे, प्रवचने, साहित्य, कवी संम्मेलने, बैध्दीक, छोट्या मुलांचे चित्रकला, हस्तकला, गाणी, नृत्य यांसाठी संस्थांना अल्प दरात भाड्यांने देणे, छोटे कार्यकम जसे हळदी कुंकू, भोंडला, सांस्कृतिक कार्यकम, वाढदिवस या करता महानगरपालिके तर्फे भाड्याने देणे. इतर अनेक ही कल्पना पुढे येतील पण पनवेल शहराच्या मध्यवती असलेली ही वास्तु एकल न होता वावरती झाली पाहीजे. येथे आत व बाहेर रायगड मधील प्रसीध्द स्वात्रर्त्य सैनीकांची तैल चीत्रे, शिवराज्याभिषेक ई. चित्रे रंगवली पाहीजेत. पनवेल तालुक्यातील सर्व स्वात्रर्त्यसैनीकांची नावे असलेली कोनशीला बसवली पाहीजे. स्वातंर्त्य सैनिकांचे ऊत्तराधीकारी म्हणुन आंम्ही आपणास नक्की मदत करु व स्वयंसेवकाचें काम करु व वास्तु जागती ठेऊ.
तरी आपण आपल्या स्तरावर या वास्तुचा कायापालट करुन ती सर्वसामान्य नागरीकांसाठी वापरती होईल अशा प्रकारचे नियोजन कराल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवेदनाची दखल घेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सकारात्मक दुजोरा देवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच याबाबत लवकरच आयुक्तांसोबत भेट घेवून त्यांच्यासमोर हा विषय मांडू असे आश्वासन दिले आहे.
फोटो ः सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन देताना स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सुरेंद्र गोडबोले, बबन जगनाडे, श्याम वालावलकर व यतीन ठाकूर आदी