कळंबोली पोलीस स्टेशन येथे हळदीकुंकू समारंभ सपन्न
पनवेल/वार्ताहर:कळंबोली पोलीस स्टेशन येथे हळदीकुंकू समारंभ पार पडला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील, कळंबोली पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी काळे , पोलीस उपनिरीक्षक अर्चना गाढवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा बनसोडे, महिला सहाय्य कक्ष, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता जाधव कामोठे पोलीस स्टेशन, श्रीमती ज्योती संजय पाटील, कळंबोली पोलीस स्टेशन कडील महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलिस स्टेशन मधील महिला अंमलदार हजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती नेहा पटेल स्त्रीरोग तज्ञ यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी महिलांच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांवर मोलाचे मार्गदर्शन केले.