खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अटक
वार्ताहर:मयत विनोदभाई सदाशीव पाटील , वय ४८ वर्षे , एांदा – सुरक्षारक्षक , रा . वाडीलाल केमीकल्स लिमिटेड कंपनी , प्लॉट नं.डी / ३ ९ ७ , तुर्भे एमआयडीसी , नवी मुंबई , मुळ रा.ब्लॉक नं .२ / ३५ , सुदंरम आवास योजना , पंचरत्न ई.डब्लु.एस.च्या जवळ , वस्त्राल , अहमदाबाद , गुजरात हा नेहमी दारू पिण्याच्या सवयीचा होता . दि .१२ / ०२ / २०२१ रोजी त्याचे केबीनमध्ये मयत अवस्थेत मिळून आल्याने तुर्भे पोलीस ठाणे अ.म.रजि.नंबर ०५/२०२१ सीआरपीसी १७४ अन्वये दाखल करण्यात आला होता . सदर अकस्मात मृत्यू प्रकरणाचे तपासामध्ये मयत याने सिक्युरीटी केबीनमध्ये लघुशंका व संडास केल्याचा राग मनात धरून आरोपी भानुसिंग चरणसिंग तोमर , वय ३७ वर्षे , धंदा सुरक्षा रक्षक , रा.वाडीलाल केमीकल्स लिमिटेड कंपनी याने मयत याचे पोटावर , पायांवर व डोक्यावर पायातील बुटाने लाथा व लाठीने मारहान केल्याने तो मयत झाल्याचे निष्पन्न झाल्याने दि . २६/०२/२०२१ रोजी गु.रजि.नं .६८ / २०२१ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यास गुन्हयात अटक केली आहे . अटक आरोपीचे नाव : १ ) भानुसिंग चरणसींग तोमर , वय ३७ वर्षे , रा.वाडीलाल केमीकल्स लिमिटेड कंपनी मुळ रा.ब्लॉक नंबर ७३ , घर क्रमांक १३३ ९ , शिवानंद नगर , आम्रवाडी , अहमदाबाद , गुजरात गुन्हयाची हकीकत : तुर्भे पोलीस ठाणे अकस्मात रजि.क. ०५/२०२१ , सीआरपीसी कलम १७४ अन्वये दाखल करण्यात आला होता . सदर अकस्मात मृत्युची चौकशी मा.वपोनि / श्री . राजेंद्र आव्हाड व पोनि ( गुन्हे ) श्री . सुनिल कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करत होते . नमुद अकस्मात मृत्युमधील मयत इसम विनोदभाई सदाशीव पाटील , वय ४८ वर्षे , याचे कपाळा व्यतिरिक्त शरिरावर कोणतीही मोठी दुखापत नव्हती . तरी देखील हा खुनाचाच प्रकार असल्याचा संशय घेउन सखोल तपास केला . मयताचे प्रेतावर पी.एम. करतेवेळी वैदयकिय अधिकारी , मनपा हॉस्पीटल , वाशी यांनी अॅडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये मयताचे मृत्युचे कारण डोक्यास दुखापत झाल्याचे नमुद केले होते . त्याअनुषंगाने साक्षिदारांकडे चौकशी केली असता मयत इसमास कोणी मारहाण केली याबाबत प्राथमिक चौकशीत काहीएक निष्पन्न होत नव्हते.सदर प्रकरणी वेगाने तांत्रिक तपास करून व गोपनिय माहितीच्या आधारे सखोल तपास करून आरोपी भानुसिंग चरणसिंग तोमर यास ताब्यात घेउन त्याचेकडे यखोल चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे . आरोपी हा सध्या पोलीस कोठडीमध्ये असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / दीपक डोंब हे करीत आहेत . -00 — सदरची कामगिरी ही मा . पोलीस आयुक्त सो . , श्री . बिपीन कुमार सिंग , मा . पोलीस सह आयुक्त साो . , श्री . डॉ . जय जाधव , मा . पोलिस उप आयुक्त साो . , परिमंडळ – १ श्री . सुरेश मेंगडे , मा . सहा पोलिस आयुक्त साो . , तुर्भे विभाग श्री . भरत गाडे यांचे मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस ठाणेचे वपोनि राजेंद्र आव्हाड , पोनि ( गुन्हे ) सुनिल कदम , सपोनि / दीपक डॉब , पोउपनिरीक्षक दळवी , पोना / २२८२ संतोष बडे यांनी केली आहे .