मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले अशोक बाग मधील रहिवाशांंच्या समस्येचे निरसन.
पनवेल/वार्ताहर:अशोक बाग मधील रहिवाशी गेले १० दिवस ड्रेनेज च्या विषयाने त्रस्त होते.घरासमोरील सर्व्हिस ड्रेनेज हे तुडुंब भरून वाहत होते आणि त्यातून अतिशय दुर्गंध येत होती,डासांचा पण प्रादुर्भाव वाढत चालला होता.महापालिकेच्या कार्यालयात ३-४ वेळा अर्ज देऊन ही कार्यवाही होत नव्हती,टोलवाटोलवी ची उत्तर देण्यात होती.ही समस्या घेऊन अशोक बाग मधील नागरिक यांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रशन लक्ष्यात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोलून लगेच ड्रेनेज साफ सफाई करून घेतले.
आपल्या समस्येचे त्वरित निरसन करून दिल्याबद्दल अशोक बाग रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.