खारघर परिसरात आढळला मृतदेह
पनवेल, दि.6 (संजय कदम) ः खारघर वसाहत परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खारघर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 55 वर्षे आहे. अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्या शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खारघर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांच्याशी संपर्क साधावा.