पनवेल,साईनगर तरुणी बेपत्ता
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः 19 वर्षीय तरुणी राहत्या घरामधून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु.देवांशी नारायणलाल चौधरी (19 रा.साई रत्न दिप सोसायटी, साईनगर) असे नाव असून रंग गोरा, उंची 5 फूट, चेहरा गोल, नाक सरळ, कपाळ मोठे, केस काळे लांब, उजव्या हाताच्या पिढरीवर जळाल्याची जुनी निशाणी असून अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. तिला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा अवगत आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पो.हवा.एस.एम.फाळके यांच्याशी संपर्क साधावा.