कर्तृत्वान महिला गौरव पुरस्कार मेघना संजय कदम सन्मानित
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल मिडया प्रेस क्लब तर्फे सन्मान कर्तृत्वाचा कर्तृत्ववान महिला गौरव समारंभ पनवेल येथे पार पडला. सौ.मेघना संजय कदम कर्तृत्वान महिला गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यास लोक नेते रामशेठ ठाकूर, महापौर कविता चौतमल(पनवेल महानगर पालिका), गणेश कोळी अध्यक्ष (पनवेल मिडीया प्रेस क्लब).निलाताई उपाध्ये, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो ः मेघना संजय कदम यांचा सत्कार करताना आदिती सारंगधर, शेजारी रामशेठ ठाकूर, कविता चौतमोल, गणेश कोळी, निलाताई उपाध्ये, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे व इतर