८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी कर्तृत्वान महिलांना सन्मानित
पनवेल / प्रतिनिधी 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटी लि. च्या वतीने महिलांचा सन्मान करून बॅंकेच्या सुविधा बाबत माहिती देण्यात आली उपस्तीत मान्यवरांचे सत्कार करून आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बॅंकेच्या वतीने देण्यात आल्या उपस्तीत मान्यवर म्हणून खांदेश्वर पोलीस स्टेशन नवीन पनवेल चे महिला पोलीस नाईक संजुळा मोहिते , क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा- मा.सौ.रूपालिताई शिंदे , क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या नवनिर्वाचित विचुंबे विभागीय अध्यक्षा-सौ.रत्नमाला बापरेकर व बॅंकेचे अधिकारी कर्मचारी महिला वर्ग आदी होते.