महिला दिनानिमित्त महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार.
उरण/प्रतिनिधी:दि 10(विठ्ठल ममताबादे )महिला दिनाचे औचित्य साधून कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत साफ सफाईचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगार सुगंधा पाटील, सावित्री म्हात्रे ,राजश्री पाटील, मीना कोळी, वासंती पाटील तर आदर्श गृहिणी म्हणून प्रीती पाटील,प्रतिभा पाटील, अक्षता पाटील, राधाबाई पाटील, नेत्रा पाटील, पूर्णा पाटील,रेशमा पाटील, लेखिका-हेमाली म्हात्रे,उद्योजिका -आश्विनी पाटील यांचा गुलाबपुष्प, साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील,अभय पाटील,प्रणय पाटील, ओमकार म्हात्रे, सूरज पवार, नितेश पवार, साहिल म्हात्रे,अमोल मोकल, आर्यन पाटील आदी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.यावेळी प्रत्येक महिलांनी आपली ओळख करून दिली.आमच्या संस्कृतीत महिलांना आदराचे स्थान आहे. देवानंतर आईला प्रथम पूज्य मानले जाते.भारतीय संस्कृतीत स्त्रीला दैवत मानले जाते.प्रत्येक पुरुषाच्या यशात कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा हात असतो.स्त्री मुळेच पुरुषांनाही आज समाजात मानाचे स्थान आहे.स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे.त्यामुळे ह्या गोष्टींचा आदर करत स्त्रियांचा कार्याचा, त्यांच्या आचार विचारांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोणातून महिलांचा सत्कार करण्यात आल्याचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी सांगितले.