लग्नाचे आमिष दाखवून जबरीने शारीरिक संबंध ठेवणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः एका महिलेशी प्रेम संबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबरीने शारीरिक संबंध ठेवून तसेच सदर संबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केली असून ती सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी देणार्या इसमाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक 27 वर्षीय महिला व आरोपी विजय मथरेजा (33) यांचे सन 2015 ते सन 2017 दरम्यान एकाच कंपनीत कामाला होते. या दरम्यान सदर इसमाने सदर महिलेशी प्रेम संबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबरीने शारीरिक संबंध ठेवून तसेच सदर संबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केली असून ती सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी दिल्याने याबाबत सदर महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.