पोलीस असल्याची बतावणी करून दागिने काढून घेतले
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः दोन अनोळखी इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून एका इसमाकडून जवळपास 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेवून पसार झाल्याची घटना नावडे गाव परिसरात घडली आहे.
सुरेश म्हस्कर (51) हे जोमा म्हात्रे विद्यालय मेन गेटसमोर नावडे गाव येथे असताना त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले व त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडे असलेले सोन्याची चेन व अंगठी व इतर दागिने असा मिळून जवळपास 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचा ऐवज फसवणूक करून काढून घेवून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.