चिरनेर येथील विठ्ठभट्टी कामगारांना कपडे व धान्याचे दान
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )सावीत्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून चिरनेर येथील वेगवेगळ्या तिन विठ्ठभट्ट्यांवर रोजंदारीवर काम करणार्या महिला, पुरूष ,व सर्व वयोगटातील मुले-मुली यांना कपडे व गहू-तांदळाचे दान देण्यात आले. महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाज सेवक एस.आर.तोगरे व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळ, उरण च्या अध्यक्षा सुमनताई तोगरे यांच्या दातृत्वाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाचे आयोजन छावा प्रतीष्ठान चिरनेर मार्फत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला एस.आर.तोगरे व सुमनताई तोगरे यांच्या सोबत छावा प्रतीष्ठान चिरनेर चे अध्यक्ष व आभिनेता सुभाष कडू, चिरनेरच्या उपसरपंच प्रियांका गोंधळी,मुक्ता साळवे महिला समुह व निर्भिड पत्रकार संघ, महाराष्ट्र.अध्यक्षा रूचिता मलबारी,ग्रा.पं. सदस्य रमेश फोफेरकर,रिनल तिडके,शिवसेना कार्यकर्ते संतोष म्हसुरकर, हनुमा कोळी,सूरज तिडके, रमेश पोखरकर,संकेत म्हात्रे,स्वप्रिल पाटील, पृथ्वीराज कडू आदी उपस्थीत होते.
एस.आर.तोगरे, व सुमनताई एस.तोगरे, या जेष्ठ नागरीक आहेत.परंतू त्यांच समाजकार्य हे तरुणांना लाजवीणार आहे.त्यांच्या माध्यमातून आम्हाला सामाजीक कार्य करण्याची प्रेरणा व पूण्य मिळते.
– सुभाष कडू
अभिनेता, अध्यक्ष छावा प्रतीष्ठान चिरनेर, उरण.