शांताराम बामा पाटील यांचं. वयाच्या 86 व्या वर्षी बामण डोंगरी येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने दुःखद निधन
पनवेल, दि.1 (वार्ताहर) गव्हाण पंचक्रोशीतील व उलवे नोड नवी मुंबई मधील बामण डोंगरी गावचे अष्टपैलू कलाकार शांताराम बामा पाटील यांचं. वयाच्या 86 व्या वर्षी बामण डोंगरी येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
शांताराम पाटील हे प्रसिद्ध गणपती मूर्तिकार व पेंटर म्हणून सर्वांना परिचित होते. तसेच कारपेंटर म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते शेतीच्या अवजारां पासून ते ग्रामीण भागातली घरांची सर्व प्रकारची बांधकामे ते करीत असत. संगीता ची हीआवड त्यांना होती. संगीत भजनात ते पखवाज वाजवया चे. गावात होणार्या हनुमान मंदिरातील रोजच्या हरिपाठात त्याची हजेरी असायची गावातील संस्कृती क कार्यक्रम आयोजनात त्यांचा पुढाकार असायचा
मृत्यू समय काही एक तास अगोदर त्याने हरिपाठ ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. व हरिपाठ करणाऱ्या सर्वांना जेवण देण्याचे त्यांनी कुटुंबियांना सुचवले. त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर काही तासांतच
त्यांचं निधन झालं.
प्रेमळ अजत शत्रू म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.