एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग व सी डब्ल्यू ऑफिसमधील मोबाईल चोराला अटक
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन वरुन मुंबईला रवाना होणार्या कोईम्बतुर एक्सप्रेस मधील प्रवाशाची बॅग आणि पनवेल स्टेशन वरील प्लॅटफार्म क्रमांक 05 वरील सी डब्ल्यू ऑफिस मधील कर्मचार्याचा मोबाईल पळवणार्या आरोपीस 8 तासात अटक करण्यात पनवेल रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे.
पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात फोन वाजतो. आरपीएफ़ कंट्रोल सीएसएमटी कडून माहिती दिली जाते कि कोईम्बतुर एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाची बॅग पनवेल स्टेशन वरुन गाडी सुटताना खेचून घेऊन आरोपी पळून गेला आहे. त्यामध्ये प्रवाशाचे रोख 30 हजार रुपयांसह एकूण 35 हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे. पनवेल रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक जसबीर राणा यांनी मेसेज मिळताच एएसआय के पी पांडे, शिपाई सचिन सरोहा व मोनु तोमर यांचेसह ते घटनास्थळी पोहचले. कोईम्बतुर एक्सप्रेस पनवेल स्टेशनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे निघाली असता एस 6 या कोच मध्ये सीट नंबर 2 वरील प्रवासी जया चावला यांच्या हातातील बॅग काळा टी शर्ट, पँट व काळी टोपी घातलेली व्यक्ती खेचून घेऊन पळाली होती. त्या बॅगेत आई फोनचा चार्जर, किमती सामान, कपड़े, रोख 30000/- रुपये असे एकूण 35000/- रुपयांचे सामान असल्याचे समजले. आसपास शोधले असता झाडीत काळ्या रंगाची बॅग सापडली. त्यामध्ये 03 सफ़ेद रंगाचे चार्जर, एक सफ़ेद रंगाचे ब्लुटूथ, 02 चाबी, डेटॉल लिक्विड, 01 कंगवा, 01 छोटा स्टीलचा ग्लास मिळाला. निरीक्षक जसबीर राणा घटनास्थळाजवळ पुन्हा आले असता पनवेल रेल्वे स्टेशन के प्लैटफ़ार्म क्रमांक 05 वरील सी डबल्यू ऑफिसचे कर्मचारी रामसागर मीना यांनी काही वेळा पूर्वी त्यांचा ही मोबाइल चोरी झाल्याचे सांगितले. कोईम्बतुर एक्सप्रेस पनवेल स्टेशनवर आली आणि गेली त्यावेळचे प्लॅटफ़ार्म क्र्मांक 07 वरील सीसीटीवी फूटेज तपासले असता एक व्यक्ति काळ्या रंगाची टोपी व टी शर्ट घातलेली दिसून आली. तीच व्यक्ती कोईम्बतुर एक्सप्रेस प्लॅटफ़ार्म वरुन सुटताना कोच नं ड5 मध्ये चढताना दिसली. थोड्यावेळाने प्लॅटफॉर्म क्र्मांक 05 वरील पुलावरवर दिसली नंतर सी डबल्यू ऑफिस मधून एक मोबाइल चोरी करून जाताना दिसली.
पनवेल रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या नवनाथ नगर झोपड़पट्टीमध्ये निरीक्षक जसबीर राणा, विक्रम घोरपड़े, शिपाई आदित्य यांनी त्या वर्णनाच्या व्यक्तीचा तपास सुरू केला. या वर्णनाची व्यक्ती झोपड्पट्टीजावळी फिरताना दिसली. तिला आरपीएफ़च्या पनवेल कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव रितिक राजू पवार वय -20 वर्ष पता- वार्ड नं 13, सोमजावाड़ी, खोपोली सांगून आपण कोईम्बतुर एक्सप्रेसच्या कोच एस 6 बर्थ न 02 वरील प्रवाशाची बॅग पळवली आणि त्यानंतर पनवेल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफ़ार्म क्र्मांक 05 वरील सी डबल्यू ऑफिस मधून मोबाइल चोरी केल्याचे कबूल केले.