बीएमडब्लू गाडीला लागली आग
पनवेल दि.08 (वार्ताहर): एका भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्लू गाडीला अचानकपणे लागलेल्या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने गाडीतील तीनही प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
पनवेल बाजूकडून पुणे बाजूकडे एक्सप्रेस मार्गावरून जाणाऱ्या बीएमडब्लू गाडीला अचानकपणे अचानकपणे आग लागली. यावेळी गाडीतून तीन जण प्रवास करीत होते. आगीचे गांभीर्य ओळखून सदर प्रवासी पटकन गाडीतून बाहेर पडले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले व त्यांनी आग विझवली आहे. सदर आग हि शॉर्टसर्कीटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. यात गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे.