रिक्षाच्या धडकेत महिला जखमी
पनवेल दि.08 (वार्ताहर): रिक्षा वेगाने चालवून पायी चालत जाणाऱ्या 55 वर्षीय महिलेला धडक दिल्याने या धडकेत महिला जखमी झाली आहे. कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे, सेक्टर 12 येथील नंदा पूकळे ह्या शंकर मंदिर, कामोठे गाव येथून दर्शन घेऊन पायी चालत जात होत्या. यावेळी रिक्षा क्रमांक एम एच 46 एसी 2640 वरील चालकाने भरधाव वेगाने येऊन त्यांना धडक दिली. या धडकेत नंदा या जखमी झाल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रिक्षाचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.