सपोउपनि राजीव कदम यांचे दुःखद निधन
पनवेल दि.08 (वार्ताहर)- पोलिस खात्यातील राजा माणूस असलेल्या सपोउपनि राजीव कदम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून त्यांचे अंतिमसंस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात आले. पनवेल शहर पोलिस ठाणे, पनवेल तालुका पोलिस ठाणे, नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये काम केलेले वसध्या आर, बी, आय, सुरक्षा येथे नेमणूक असलेले सपोउपनि राजीव कदम यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी रूग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल पोलिस खात्यासह मित्रपरिवाराने हळहळ व्यक्त केली आहे. फोटोःसपोउपनि राजीव कदम