पोलिस असल्याचे सांगून अडीच लाखाच्या दागिन्यांची चोरी
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः पोलीस असल्याचे सांगून 64 वर्षीय इस्मा कडील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 4 येथील दत्ताराम शिवराम मावळे हे त्यांच्या पेन्शनचे पैसे बँकेच्या खात्यात जमा आहेत का याची चौकशी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेक्टर 4 खारघर येथे गेले होते. ते त्यांचे काम आटपून घरी परत जाण्यास निघाले असताना बेलपाडा रोडने चालत जात होते. यावेळी एका मोटरसायकल वर आलेल्या इसमाने त्यांना बोलावले व तो पोलिस वाला असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची चैन त्याने पिशवीत ठेवायला सांगितली. यावेळी मोटर सायकल वर बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातून सोन्याची चेन ठेवलेली पिशवी घेऊन तिला गाठ मारली व ती रुमालात गुंडाळून दत्ताराम यांना परत केली. व ते मोटरसायकलवर निघून गेले. दत्ताराम यांनी पिशवी उघडून त्यात सोन्याची चैन आहे का याची खात्री केली असता चेन सापडून आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
