छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष समाजसेवक प्रसाद रंगीले ( गोलू भाई ) यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने संपन्न
पनवेल दि.१४ (वार्ताहर)- छत्रपती शिवाजी महाराज श्रमिक महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष समाजसेवक प्रसाद रंगीले ( गोलू भाई ) यांचा वाढदिवस निमित्ताने गरजूना अन्न धान्य वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते व कामगारांचा व गरजवंतांचा हाकेला धावणारे प्रसादजी रंगीले यांचा वाढदिवस निमित्त त्यांचा सहकाऱ्यांचा वतीने ५०० गरजू कुटुंबाना अन्नधान्य चे किट वाटप करण्यात आले या वेळी प्रसाद भाऊ रंगीले , संजय पवार , डी. एन.मिश्रा , तेजस जाधव , निसर खान , विशाल बाबर , सुधीर ठोंबरे , तुषार ढेकळे ,प्रथमेश फणसे , अजय कांबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
