पनवेल परिसरातील 25000 रिक्षा चालकांना मिळणार दीड हजाराची मदत….
पनवेल,(प्रतिनिधी) — पनवेल परिसरात सुमारे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलमध्ये परवानाधारक असलेले रिक्षा चालक सुमारे 25 हजार रिक्षा चालक आहेत. मात्र बहुतांश रिक्षा चालकांनी शासनाने केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे. भाड्याने रिक्षा चालविणाऱ्या चालकांनी या मदतीचा लाभ द्यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. तयाचबरोबर मृत्यू संख्या देखील वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रिक्षाची प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच एक चालक व दोन प्रवासी अश्या अटीप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. शासनाकडून फक्त परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु भाड्याने रिक्षा चालविणाऱयांची संख्याही मोठी आहे. ज्यांची रिक्षा नाही, परंतु रिक्षा चालवितात. त्यांचे काय? असा प्रश्न पनवेल परिसरातील काही रिक्षा चालकांनी दैनिक पुढारीशी बोलताना माहिती दिली. दिल्ली, कर्नाटक तेलंगणा सरकारने लॉकडाउनच्या काळात पाच हजार रुपयांची मदत देऊ केली. त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पाच हजारांची मदत द्यायाला हवी होती. अशी अपेक्षाही काही रिक्षा चालकांनी व्यक्त केली. रिक्षा चालविण्याचा परवाना आहे. बॅच आहे, परंतु रिक्षा नाही. अशा चालकांनाही दीड हजार रुपयांची मदत द्यावी. अशी मागणी पनवेल परिसरातील रिक्षा चालकांची आहे. परंतु याबाबतचा काय निर्णय आहे. ते शासन आदेशानंतरच कळणार असले तरी शासनाच्या रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची केलेल्या मदतीच्या घोषणेमुळे पनवेल परिसरातील रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
परवाना धारक अनेक रिक्षा चालक भाड्याने रिक्षा देतात. अशा रिक्षा चालकांनाही या योजनेत मदत द्यायाला हवी, जाहीर झालेल्या मदत कमी आहे. दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर पाच हजार रुपये मदत देयाला पाहिजे होती. अनेकांनी कर्जावर रिक्षा घेतली आहेत. त्यांचे हप्ते फेडणे मुश्किल झाले आहे.
– गणेश भापकरे – रिक्षा चालक
शासनाने परवाना रिक्षा चालकांना जाहीर केलेली मदत समाधानकारक आहे. संचारबंदीमुळे रिक्षा चालकांना धंदा नाही. त्यामुळे कौटुंबिक गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने दिलेली मदत लवकरात लवकर रिक्षा चालकांना मिळावी.
– नरेश परदेशी – अध्यक्ष
स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक संघटना