श्री साई देवस्थान साईनगर वहाळ येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उलवे नोड मधील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील वर्षी जशी कामगिरी केली होती त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, तहसीलदार कार्यालय पनवेल, प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल, एनआरआय सागरी पोलीस ठाणे, श्री साई देवस्थान साई नगर वहाळ, रवी पाटील सामाजिक विकास मंडळ व उलवेतील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक मंडळे यांची संयुक्त बैठक श्री साई देवस्थान साई नगर वहाळ येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठक की प्रसंगी एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील तसेच तहसीलदार कार्यालयाचे तेलंगे, मंडळ अधिकारी एस एम जोशी, श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील तसेच विविध सेवाभावी संस्था व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांनी घरातच रहावे, असे आवाहन सुद्धा करण्यात आले.