कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळा, मास्क वापरा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करा- जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे
पनवेल दि.19 (वार्ताहर)- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेशभाई संसारे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे व पनवेल शहर कमिटी व तालुका कमिटीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “ब्रेक ऑफ द चैन” अशी संकल्पना मांडून राज्यात कडक निर्बंध लावले आहेत, दिनांक 15 एप्रिल ते 1मे सकाळी 7 वाजेपर्यंत जनतेला आवश्यक कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये असे जाहीर आवाहन केले आहे. तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळा, मास्क वापरा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले आहे.
त्या अर्थी सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात येत आहे की, आपल्या शहरामध्ये, तालुक्यातील गावामध्ये काही हॉस्पिटलबाबत प्रश्न, अन्य कोणते प्रश्न असतील तर ते लक्षात घेऊन लोकांच्या सेवेसाठी काम करायचे आहे, या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हे आपल्या पनवेल शहर व तालुका कमिटीच्या वतीने जनतेचे प्रश्न सोडवून अहोरात्र मेहनत करत आहेत तसेच या लढ्यात पनवेल शहर पोलीस व तालुका पोलीस प्रशासन पोलीसबांधव, डॉक्टर, नर्स हे सर्व अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचे पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो, तसेच पोलीस बांधव अत्यंत शांत परीने लोकांना हाणामारी न करता त्यांना चांगल्या प्रकारे समजवून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करत आहेत, आत्ताच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली. राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनने जयंतीला कमीत कमी लोकांनी उपस्थित राहून जयंती साजरी करायची आहे असे आवाहन केले त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, पनवेल पोलीस प्रशासन यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पनवेल शहर सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात येत आहे की शहरातील नागरिकांवर अन्याय होत असतील, किंवा हॉस्पिटलमध्ये काही त्रास असेल, किंवा समाजातील, कार्यकर्ताच्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी आमचा पक्ष तत्पर सदैव राहील. व कोरोनाची साखळी तोडायची आहे त्यामुळे नागरिकांना संदेश देत आहोत. गर्दी टाळा, कोरोना पळवा मास्क वापरा, सॅनिटीझर वापरा, घराबाहेर पडू नका, पोलिस प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले आहे.
फोटोः महेश साळुंखे