आशा कि किरण फाउंडेशनतर्फे रमजाननिमित्त गरजुंना अन्नधान्याचे वाटप.कच्ची मोहल्ला, वडघर तसेच मालधक्का परिसरातील गरजुंना करण्यात आले वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून अनेक लहान – मोठे व्यवसाय बंद पडले असून सर्वच कारभार एकंदरीत बंद असल्याने गोर – गरीब जनतेला आर्थिक संकट व उपासमारीला सामोरे जावे लागले आहे. मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजेच रमजान महिना अशा या पवित्र रमजान महिन्यात आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांच्यावतीने पनवेलमधील कच्ची मोहल्ला, वडघर तसेच मालधक्का परिसरातील गरजुंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी आयेशा कुरेशी, आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, नूरजहाँ कुरेशी, जस्मिन नझे, समीर सेन, रशिदा शेख, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, ओमकार महाडिक, शफिक शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.