उरण मधील अभिनेता सुभाष कडू यांनी घेतला कोविशिल्डचा पहीला डोस. नागरीकांना लस घेण्यासाठी केल आवाहन.
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )अभिनय क्षेत्रात ठसा उमटवीणारा उरण मधील अभिनेता सुभाष कडू यांनी आज कोप्रोली ग्रामिण आरोग्य केंद्रात जावून कोवीड 19 वरील कोविसिल्ड लसिचा पहीला डोस घेतला.
चिरनेर या मराठी चित्रपटाद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार्या सुभाष कडू यांनी पुढे जावून रंग हे रंगिले प्रेमाचे हा चित्रपट,तर सध्या गाजत आसलेल्या आई कुठे काय करतोय, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, स्वामिनी,लाडाची लेक गं,तु चांदणे शिंपित जाशी, या मराठी मालिकांमध्ये काम केल आहे.तर आघोरी ही हिंदी वेबसिरीज मध्येही काम केल आहे.विशेष म्हणजे ते उत्कृष्ट लेखक, पत्रकार, उत्कृष्ट अष्टपैलू कलाकार देखील आहेत.
डोस घेतल्यानंतर कोरोना साखळी तोडण्यासाठी,या महामारीला हारविण्यासाठी प्रत्येकाने लसिकरण करुन घेण गरजेच आहे. त्यामूळे नागरिकांना लसिकरण करण्याचे आवाहन अभिनेते सुभाष कडू यांनी केले आहे.