पोलिसांमार्फत नागरीकांना करण्यात येत आहे जनजागृती
पनवेल दि 27 (संजय कदम): सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वर्भुमीवर नागरीकांना विविध अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातूनच त्यांना योग्य ती माहिती मिळावी या उद्देशाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालया मार्फत प्रत्येक पोलिस ठाण्यातील दर्शनीय भागात माहिती देणारे फलक उभारण्यात आले आहेत.
अश्याच प्रकारे पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात माहिती फलक उभारण्यात आला असून, त्याद्वारे वाहनांसाठी ई-पास माहिती, दुचाकी वाहनावर एकच माणूस आवश्यक, तीन चाके वाहनांसंदर्भात माहिती, चार चाकी वाहनासंदर्भात माहिती, माल वाहतुकीच्या वाहनासाठी असलेले नियम, शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, वैद्यकीय सेवा अधिकारी, अत्यावश्यक सेवा पुरविणारे या साठी ई-पास व त्याचे संकेतस्थळ आदी संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तक्रारदारांची गर्दी होऊ नये या साठी मुख्य प्रवेशद्वारा जवळच बॅरीकेट व सॅनीटायजर स्टँड उभारण्यात आला आहे. कोरोनाची लागण पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना होऊ नये या साठी सर्वतोपरी खबरदारी प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस खात्या मार्फत घेतली जात आहे.
कोट
नागरीकांनी घरातच रहावे, आवश्यक असेल तेव्हाच घरा बाहेर पडावे. शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे- वपोनी रविंद्र दौंडकर