सायन पनवेल महामार्गावर कडक नाकाबंदी..!
ई-पासपासून मुंबईत प्रवेश… कामोठे पोलिसांची करडी नजर
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः राज्यात जिल्हा बंदी असून देखील बिनदिक्खत पणे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फिरणार्यावर आता पोलिसांनी कडक कारवाईला सुरवात केली आहे. यांचा प्रारंभ कामोठे पोलिसांनी केली आहे. सायन पनवेल महामार्गावर मुबई च्या दिशने जाणार्या मार्गावर मॅक डोनाल्ड च्या विरिद्ध दिशेला नाका बंदी सुरू करून, वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांकडे श रिीी नसेल अश्या वाहनांना मुबईत जाण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अत्यावशक असेल तरच घरातून बाहेर पडण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत, त्या सोबत एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी बंदी घातली आहे. अत्यावश्यक सेवेतील सेवांना जिल्हा बंदीतून वगळण्यात आले। आहे. त्या सोबत अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक अश्या सूचनांना हरताळ फसताना दिसून येत आहे. त्या मुळे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. मात्र आता पोलिसांनी अश्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची सुरवात केली आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी घरातून विनाकारण रस्त्यावर फिरणार्या वर कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाई नंतर आता सायन पनवेल महामार्गावर नका बंदी करून जिल्हा बंदीचे उल्लंघन करणार्या वाहनावर कारवाई ला सुरवात केली आहे. ई-पास शिवाय फिरणार्या वाहनांना मुबईत प्रवेश दिला जात नाही. सायन पनवेल महामार्गावरील मॅक डोनाल्ड च्या विरुद्ध दिशेला नाका बंदी करून, या वाहनांची तपासणी केली जात आहे. आणि प्रवासाचे कारण विचारून सोडले जात आहे. अनावश्यक फिरणार्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या साठी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव रस्त्यावर उतरल्या आहे.
चौकट
ई-पास नसणार्यांवर दंडात्मक कारवाई : स्मिता जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे पोलीस ठाणे
ई-पास शिवाय घरातून बाहेर पडणार्यावर, आणि आंतरजिल्हा प्रवास करणार्यांवर, पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायन पनवेल महामार्गावर नाका बंदी करून, मुबईत विना ई-पास शिरकाव करू पाहणार्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या मध्ये दंडात्मक कारवाई त्या सोबत पुन्हा परतीच्या मार्गावर या वाहनाला जाण्यास सांगितले जात आहे.
चौकट
नाका बंदी दरम्यान झोम्याटो बॉय वर कारवाई
कडक निर्बधाची घोषणा केल्या नंतर, हॉटेल व्यावसायिकांना होम डिलिव्हरी साठी परवानगी देण्यात आली होती, मात्र त्या साठी अटी देखील घालण्यात आल्या होत्या, त्यामध्ये पार्सल देणार्या व्यक्तींची आर्टिफिसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे. 15 दिवस या टेस्ट ला मुदत होती, 15 दिवसां नंतर पुन्हा नवीन टेस्ट करणे बंधनकारक आहे. मात्र असे असताना देखील टेस्ट न करणार्यावर या नाका बंदीत कारवाई चा सामना करावा लागत आहेत. या नाकाबंदीत झोम्याटो पार्सल बॉय वर कारवाई करण्यात आली आहे.