कोरोनाशी कडवी झुंज देणार्या महाराष्ट्र सरकारला मदतीचा हात म्हणून 1 लाखाचा पनवेल तालुका कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिला धनादेश
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः कोरोनाशी कडवी झुंज देणार्या महाराष्ट्र सरकारला मदतीचा हात म्हणून 1 लाखाचा पनवेल तालुका कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द करून एक आगळावेगळा पायंडा पाडला आहे.
कोविड झाल्यावर जशी वास घेण्याची क्षमता जाते, जिभेची चव जाते, तसं काहीसं मनाचं झालं आहे. आजूबाजूचं मरणाचं पेटलेलं स्मशान पाहून कुठलाच आस्वाद घेण्याची, आनंद उपभोगायची ईच्छा राहिलेली नाही. आपला वाढदिवस. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत साजरा करायचा नाही असे पनवेल तालुका कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी ठरविले. कोविडशी कडवी झुंज देणार्या महाराष्ट्र सरकारला आपला छोटासा हातभार लावावा म्हणून 1 लाख रुपयांचा धनादेश रायगडच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. जे पैसे अन्यथा मौजमजेत खर्च झाले असते, त्यातून कुणालातरी जगण्यासाठी ऑक्सिजन मिळेल हेच एकमेव समाधान आपल्याला मिळाले असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. यावेळी सोबत पनवेल शहर काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील उपस्थित होते.