घरफोडीत लाखोचा ऐवज केला लंपास
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः आकुर्ली येथे राहणार्या अनंत पगारे यांच्या उघड्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करून दोन लाख 65 हजार पाचशे रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञात चोरांविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम रेसिडेन्सी सोसायटी, काकाजीनी वाडी जवळ आकुर्ली येथील अनंत पगारे यांच्या घराचे पेंटिंगचे काम सुरू होते. यावेळी त्यांच्या घराचा व बेडरूमचा दरवाजा उघडाच असे. त्यांची पत्नी सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टिकचा डबा काढण्यासाठी गेली असता त्यात सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टिकचा डबा सापडून आला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील दोन लाख 65 हजार पाचशे रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे.