श्री बबन बारगजे यांनी दिलेल्या निवेदनाची पालीकेने घेतली तातडीने दखल.आरोग्य निरीक्षक श्री जितेंद्र मडवी,अभियंता चिन्मय सापणे व पर्यवेक्षक हरीश कांबळे यांचीकळंबोली येथील स्मशानभूमीची पाहणी
पनवेल/वार्ताहर:भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी नुकतीच पनवेल महापालिका आयुक्त श्री देशमुख साहेब यांना कळंबोली येथे विद्युत दाहिनी बसविण्यास संदर्भात निवेदन दिले होते . त्या अनुषंगाने आज त्यांनी या पत्राची दखल घेऊन लगेचच आरोग्य निरीक्षक श्री जितेंद्र मडवी, अभियंता चिन्मय सापणे व पर्यवेक्षक हरीश कांबळे यांना कळंबोली येथील स्मशानभूमीची पाहणी करण्याकरिता पाठवले . यावेळी भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली मंडल अध्यक्ष श्री रवीनाथ पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री कमल कोठारी व शरद वाडीकर हे उपस्थित होते . जागेची पाहणी करून लवकरात लवकर विद्युत दाहिनी चे टेंडर काढून ती कार्यान्वित करण्यात येईल असे आश्वासन श्री जितेंद्र मडवी यांनी दिले. कळंबोलीतील समस्या साठी भाजपाचे पदाधिकारी नेहमीच अग्रेसर असतात. आणि लोकांना सर्व सोयी सुविधा कशा मिळतील याकडे त्यांचा कटाक्ष असतो. प्रत्येक कार्यकर्ता वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे या कालावधीमध्ये अशा वेगळ्या विषयाकडे लक्ष वेधून ते काम मार्गी लावल्याबद्दल बबन बारगजे यांचे कळंबोलीतील नागरिकाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.