अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देणारा तरुण गजाआड
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः अल्पवयीन मुलीस तीचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर टाकतो अशी धमकी देवून तसेच ते फोटो तुझ्या वडिलांना दाखवितो अशा प्रकारची धमकी देणार्या एका तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीचा आरोपी मयुर मोहिते (25) याने वेळोवेळी पाठलाग करून तसेच मोबाईलद्वारे, व्हॉटसअप वर व्हिडीओ कॉल करून तीला भावनिक करून जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगून तीला न विचारता चोरुन तीचे अश्लिल फोटो काढून तसेच तीला व्हाटस्अप चॅटींग करून तीला पुन्हा तीचे अश्लिल फोटो काढण्यास सांगून व ते फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करतो म्हणजे पैसे मिळतील असे तीला सांगितले. परंतु या गोष्टीस तीने नकार दिल्यावर व त्याच्या बरोबर बोलणे बंद केले असता त्याचा राग मयुरला येवून त्याने आपल्याकडे असलेले सोशल मिडीयावर व्हायरल तसेच तिच्या वडिलांना दाखविण्याची धमकी दिल्याने याबाबतची माहिती सदर मुलीने आपल्या घरी सांगितल्यावर सदर मुलाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार आदींच्या पथकाने सदर मुलाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.