पिकअप गाडीची धडक बसल्याने इसम ठार
पनवेल, दि.7 (संजय कदम) ः रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या महिंद्रा पिकअप जीपची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक इसम ठार झाल्याची घटना पनवेल जवळील कर्नाळा दरबार हॉटेल परिसरात घडली आहे.
पिकअप चालक सुरज गुरव (25) व संतोष गावडे (42) हे पनवेल येथून कोकणात पहाटेच्या वेळी जात असताना कर्नाळा दरबार हॉटेल जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर यांची गाडी जावून आदळल्याने झालेल्या अपघातात जीपमधील संतोष गावडे हे गंभीररित्या जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला आहे.