फोटो काढण्यावरुन तिघांनी केली एका इसमास मारहाण
पनवेल, दि.7 (संजय कदम) ः सोसायटीमधील मागील गेटवरुन उडी मारुन येत असलेल्या तिघांचे फोटो काढले याच्यावरुन एका इसमास या तिघा जणांनी मिळून शिवीगाळ करून धमकी देवून हाताबुक्क्यांनी व धातूच्या फाईटने मारहाण करून त्यांना दुखापत केल्याची घटना पडघे येथील कृष्ण पार्क सोसायटीमध्ये घडली आहे.
येथे राहणारे अमरकांत पासवान (35) यांच्या सोसायटीमध्ये तीन अनोळखी मुले सोसायटीच्या मागील गेटवरुन उडी मारुन येत असल्याचे पाहून त्यांनी त्यांचे फोटो काढू लागले असता या तिघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करून धमकी देवून हाताबुक्क्यांनी व धातूच्या फाईटने मारहाण करून त्यांना दुखापत केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
![फोटो काढण्यावरुन तिघांनी केली एका इसमास मारहाण](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2021/03/1589705802725.png)