लायन्स क्लब पनवेलतर्फे मास्कचे वाटप
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे पनवेल परिसरातील नागरिकांसाठी गरजवंतांसाठी मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत अडीच हजाराहून जास्त नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व उपक्रमाचा खर्च पनवेल लायन्स क्लबच्या अध्यक्षा ला.भावना जेसवानी यांच्या तर्फे करण्यात आला. या उपक्रमाला रिजन सात चे चेअरमन ला.संजय गोडसे, रिजन सचिव ला.सुयोग पेंडसे, ला.अशोक गिल्डा यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ला.भावना जेसवानी, ला.राजेंद्र जेसवानी यांना पनवेल क्लबच्या सर्व लायन सभासदांचे सहकार्य लाभले आहे.