शिवसेनेच्या माध्यमातून गरजूंसाठी अन्नदानाचे वाटप
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेसाठी कामोठे शिवसेनेच्या माध्यमातून अन्न वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कामोठे येथे शिवसेनेच्या माध्यमातुन शाखाप्रमुख सागर भोर ह्यांच्यातर्फे गरजुंसाठी अन्नवाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील, शहरप्रमुख राकेश गोवारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.