डॉ. दशरथ गोपाळ माने यांना कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनियरींगमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः कामोठे येथील रहिवासी डॉ. दशरथ गोपाळ माने यांनी कंप्युटर सायन्स अॅन्ड इंजिनियरींगमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे कामोठे व पनवेल महानगर क्षेत्रांच्या परिसरात मनाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच माने कुटुंबाचे नाव लौकिक वाढला असून त्याबद्दल पनवेल महानगर क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या त्यांच्या उज्वल यशामुळे पनवेल महानगरात परिसरातील युवक युवतींना एक नवा आदर्श प्रस्थापित झाला असून त्यातून त्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल त्यांचे मित्रमंडळी आणि एकता सामाजिक संस्थाचे शिलेदार अमोल शितोळे, मंगेश आढाव, अल्पेश माने, गणेश शिंदे, गजानन उर्फ बापू साळुंखे, जयकुमार डिगोळे, प्रशांत कुंभार, रवींद्र जाधव, संभाजी पवार आणि गौरव जहागीरदार यांनी त्यांचे अभिनंदन केले. पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी माने यांचे अभिनंदन केले आहे. तसेच उत्तरोत्तर अशीच प्रगती करून यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी डॉ. दशरथ माने यांना शुभेच्छा दिल्या.