उन्मेष म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) स्व . उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवार दि.17 मे 2021 रोजी होणाऱ्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समर्पित कोविड आरोग्य केंद्र बोकडविरा उरण या केंद्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, व कोविड पेशंट यांच्या साठी PPE kit , N19 मास्क ,हॅन्डग्लोज असे वैदयकीय साहित्य ऊर्मिला रमेश म्हात्रे व त्यांचे पती रमेश भास्कर म्हात्रे आवरे उरण यांच्या मार्फत
तालुका आरोग्य अधिकारी डॉ . ईटकरे आणी डॉ .स्वाती म्हात्रे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.कार्यक्रमाच्या ठिकाणी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे साहेब , डॉ अरुणकुमार भगत-आरोग्य सभापती महानगर पालिका पनवेल , संतोष पवार-कर्मचारी नगर पालिका उरण , सुनील भोपत राव , नरेंद्र पाटील , आदित्य भगत,योगेश कडू आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.