नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.
पनवेल दि.17 (वार्ताहर)अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, शेतकरी कामगार पक्ष्याचे नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वतीने आयोजित केलेलं रक्तदान शिबीर त्याला कारणही तसंच आहे.
कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे कळंबोलीसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रविंद्र भगत यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास कोरोना ची लढाई करण्यासाठी एक किट देण्यात येणार आहे. रक्तदात्यांना एक स्टीम इनहेलर मशीन, सिनिटायझर , N९५ मास्क अश्या पद्धतीने एक किट वाटप करणार आहे. हे घरातील माणसांनी वेळोवेळी उपयोग करावा.
मंगळवारी, १८ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कळंबोली बस डेपो समोर नगरसेवक रविंद्र भगत यांच्या कार्यलयात हे रक्तदान शिबीर होणार आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिकाधिक संख्येनं लोकांनी रक्तदान करावं, एवढाच यामागचं उद्देश असल्याचं आयोजक म्हणणं आहे.