कोविड रुग्णांना इस्कॉन तर्फे पौष्टिक आहार.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )कोविड बाधित रुग्णांना आजारातून बरे होण्यासाठी पौष्टीक आहाराची मदत होते.इस्कॉन या संस्थेच्या उरण शाखेच्या वतीने DCHC कोविड सेंटर बोकडवीरा येथे कोविड बाधित रुग्णांना सुकामेवा, फलाहार रुग्णांना देण्यात आले. ही सेवा एक आठवडा रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. इस्कॉन तर्फे डॉ विकास मोरे यांनी डॉ मनोज भद्रे-अधीक्षक DCHC कोविड सेंटर यांना सदर पौष्टिक आहार सुपूर्द केले. यावेळी पालवी हॉस्पिटलचे डॉ सुरेश पाटील उपस्थित होते.कोविड रुग्णांना इस्कॉन(ISCON ) या आंतरराष्ट्रीय संघटनेने मदतीचा हात दिला असून धार्मिक क्षेत्रात भजन, कीर्तन, प्रवचन करून जनतेत जनजागृती करणाऱ्या या संघटनेने भारतात व भारताबाहेरही विविध सामाजिक उपक्रमातून ही संस्था कोरोना रुग्णांना मदत करत आहे.