चक्री वादळामुळे गोवठणे येथील घरावरील उडाले पत्रे, आंब्याच्या बागेचेही नुकसान.नुकसान भरपाईची सुनिल वर्तक यांची मागणी.
उरण दि 19 (विठ्ठल ममताबादे ) दि: 17/5/2021 संपूर्ण रायगड जिल्ह्यात समुद्रातील चक्री वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून उरण तालुक्यातही गोवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गोपाळ वर्तक यांच्या राहत्या घरावरील एकूण 8 पत्रे चक्रीवादळात उडून गेले आहेत शिवाय आंब्यांच्या बागेचेही प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेले वर्तक आधीच कोरोनाच्या कालावधीत आर्थिक संकटात असलेले सुनिल वर्तक चक्रीवादलाने आणखीन आर्थिक संकटात सापडले असून शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुनिल वर्तक यांनी शासनाकडे केली आहे.
सदर झालेली दुर्घटना समजताच घटनास्थळी तलाठी अनिल पाटील आणि कृषी सहाय्यक श्री. राठोड यांच्या समवेत सरपंच प्रणिता म्हात्रे आणि उपसरपंच समाधान म्हात्रे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून घेतले आहेत.त्यामुळे लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुनील वर्तक यांनी केली आहे.