कळंबोली प्रभाग 8 मध्ये केएल २ या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरती जात आहे,विभागाचा पाहणी दौरा केला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफसफाई व कचरा उचलण्याचे नगरसेवक बबन मुकादम यांनी दिले निर्देश
पनवेल/वार्ताहर:कळंबोली मधील प्रभाग 8 मध्ये केएल २ या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरती जात आहे . व तेच गाणं पाणी बाजूच्या उद्यानात जात आहे त्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती झालेली आहे . या साऱ्यांचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे. याची तक्रार भाजपाचे कार्यकर्ते उद्धव भुजबळ यांनी बबन बारगजे यांना सांगितली आणि आज बबन बारगजे यांनी या प्रभागाचे नगरसेवक बबन मुकादम तसेच कळंबोली मंडळ अध्यक्ष रवीनाथ पाटील प्रभागाचे अध्यक्ष प्रकाश शेलार कळंबोली शहर सरचिटणीस दिलीप बिस्ट , मनिष अरबट यांच्यासोबत त्या विभागाचा पाहणी दौरा केला. लगेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगून तेथील साफसफाई व कचरा उचलण्याचे निर्देश नगरसेवक बबन मुकादम यांनी दिले. व गटारांचा पाठपुरावा सिडकोकडे करण्यात येईल असे सांगितले. कळंबोलीतील ज्या ज्या समस्या सिडकोकडे आहेत त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा केला जाईल असे रवीनाथ पाटील यांनी सांगितले . तेथील रहिवाशांनी समस्यांची दखल घेतल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व सर्वांना विनंती केली की या ठिकाणी रस्त्यावर पाणी नाही आले पाहिजे . व उद्यानाचे घाण पाणी जाते ते बंद झाले पाहिजे.