तीन तोतया पोलिसांनी एका महिलेला दिड लाखांना लुबाडले
पनवेल दि.22 (संजय कदम)- पोलिस असल्याची बतावणी करून तिघ तोतया पोलिसांनी एका महिलेकडून जवळपास दिड लाखांचे दागिने लुबाडून नेल्याची घटना कळंबोली वसाहतीत घडली आहे.लोचना जगदाळे (वय-52) डिमार्टला खरेदीसाठी जात असताना तिघा भामट्यांनी त्यांना अडविले व आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांच्याकडील दागिने काढायला सांगून सदर दागिने पिशवीत बांधून देण्याच्या बहाण्याने आपल्याकडे घेऊन त्या तिघांनी हात चलाखीने दागिने चोरले त्यानंतर पिशवी जगदाळे यांना देऊन पलायन केले. काही वेळाने त्यांनी पिशवी उघडून बघितली असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्याने याबाबतची तक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात केली आहे.