तळोजा पोलिस ठाण्यात सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी शांतताकमिटी सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक यांची जातीय सलोखा व इतर समस्यांबाबत बैठक संपन्न
पनवेल दि.30 (संजय कदम): तळोजा पोलिस ठाणे हद्दीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक सर्वधर्मीय नागरिक, शांतता कमिटी सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक यांची जातीय सलोखा व इतर समस्यांबाबत बैठक संपन्न झाली. प्रथमतः कोविड आजाराचा प्रादुर्भाव व बचावा संदर्भातील पाळावयाचे नियम व उपाययोजना तसेच महानगरपालिका यांनी दिलेले निर्देश यांचे बाबत मार्गदर्शनवपोनी. काशिनाथ चव्हाण यांनी केले. तसेच हद्दीतील वाढत्या चोरी व इतर गुन्हे बाबत सूचना दिल्या. तसेच समाजातील लोकांच्या धार्मिक भावना जोपासण्याबाबत तसेच आपापसात समन्वय राखून गोडीगुलाबीने रहाणे बाबत मार्गदर्शन केले.हद्दीत वाढते गुन्हेगारीचे प्रमाण बघता काय काय उपाययोजना करावयाच्या तसेच करायच्या आहेत याबाबत सर्वांशी चर्चा केली . सर्वानी एकमताने सर्व सूचनांचे व मार्गदर्शनाचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविली असून आम्हीही आपल्याला योग्य ती मदत करणे बाबत आश्वासन दिले व हद्दीतील आपण राबवलेल्या योजनांचे कौतुक केले .बैठकीसाठी हद्दीतील एकूण 26 नागरिक उपस्थित होते