कामोठे वसाहतीमधील दुध डेअरीसह इतर दोन दुकानात घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली अटक
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः कामोठे वसाहतीमध्ये असलेल्या दुध डेअरीसह इतर दोन दुकानात झालेली घरफोडी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने उघडकीस आणले असून याप्रकरणी एका आरोपी गजाआड करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील घडणार्या विविध गुन्ह्यांची ऊकल करण्याबाबत तसेच जमिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारावर लक्ष ठेवण्या बाबत अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे बी.जी.शेखर-पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांच्या सुचना व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि गिरीधर गोरे व त्यांचे पथक कारवाई करीत असताना कामोठे पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर 21 मधील फुड मॅजिक, पाटील दुध डेअरी व आर्ट वॉच ही तीन दुकाने फोडून घरफोडीचे गुन्हे घडल्याने त्याबाबत कामोठे पोलिस ठाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने याचा समांतर तपास कक्ष 2 गुन्हे शाखा करीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून व पोह गडगे यांना मिळालेल्या माहिती नुसार व पोना कानू यांनी केलेल्या तांत्रिक तपास वरून संशयित इसम व अभिलेखा वरील गुन्हेगार मिथुन मोजलीस सिद्धर वय 26 वर्ष. रा. मोठा खांदा गाव, पनवेल. मुळ रा.- काशीपूर,ज्योतीनगर कॉलनी ता. बी बजार, जि. दक्षिण 24 परगणा, रा. पश्चिम बंगाल हा असल्याचे निष्पन्न झाले. सपोनि फडतरे, कराड व पो.ह साळूंखे व पोहवा सचिन पवार यांना मिळालेल्या बातमी अन्वये खांदा कॉलनी सर्कस मैदाना जवळ सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर आरोपी कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 20 घड्याळे, 7 डीओ, रूम फ्रेशनर, साबण व इतर वस्तू अं.कि.72000/ हस्तगत करण्यात आली आहे नमूद आरोपी यास कोरोना ग्राउंड वरती न्यायालयाने 13 मे रोजी जमिनावर सोडले होते त्यांनतर आठवड्यात त्याने हा गुन्हा केला आहे. नमुद आरोपीस पुढील कारवाई करीता कामोठे पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात येत आहे.