बॅनर/ होर्डिंग लावताना महानगरपालिकेची परवानगी घ्यावी ः वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः तळोजा पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील बॅनर / प्रिंटिंग करणारे तसेच रोडच्या कडेला होर्डिंग लावून जाहिरात करणारे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत बॅनर/ होर्डिंग लावताना महानगरपालिकेची परवानगी घ्यावी असे काशिनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळोजा यानी सांगितले.
तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे जाहिरातीचे फलक लावू नयेत किंवा प्रिंटींग करू नयेत. राजकीय हेतूने प्रेरित किंवा समाज्यात तेढ निर्माण होईल असे बॅनर अथवा जाहिरात कोणी छापण्यासाठी आला तर त्याची आगाऊ माहिती पोलीस ठाणे येथे देणेबाबत सूचना देण्यात आल्या.