जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने वनौषधी रोपांचे वाटप
पनवेल, दि.3 (वार्ताहर) जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले.या वेळी नागरिकांना वनौषधींची माहिती असलेली माहिती पत्रके वाटप करून जनजागृतीही करण्यात आली.
सदर कार्यक्रमात आर्या पाटील,जागृती पाटील यांच्या हस्ते डॉ.स्नेहा केणी,सेंट मेरी स्कुलच्या मुख्याध्यापिका मीना मॅडम,आरती ओझा आदी मान्यवरांना वनौषधींची रोपे भेट देण्यात आली.या वर्षीही संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांच्या घरी जावून त्यांना वनौषधी रोपे भेट दिली.या मध्ये सफेद मुसळी,अश्वगंधा,दमवेल,अर्जुन,पर्णबीज, केवडा,चित्रक,सीतेचा अशोक ,बेल आदीचा समावेश होता.
आर्या वनौषधी संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी सांगितले की,पर्यावरण दिन केवळ ५ जून पर्यत मर्यादित न राहता त्यातील संदेशाचे मोल वर्षभर राहावे.प्रत्येक नागरिकांनी पर्यावरण दिनाची सुरुवात आपल्या घरापासून करावी.तुम्हांला पृथ्वीसाठी जे जे चांगले करता येईल ते ते सारे करा.खरं तर येणारा प्रत्येक दिवस हा जागतिक पर्यावरण दिवस असतो.जागतिक पर्यावरण दिन केव्हा येईल याची वाट पाहण्याची गरजच नाही.सर्वांनीच पर्यावरण रक्षणासाठी वचनबद्ध राहिले पाहिजे.