वाशी येथे महिला बेपत्ता
पनवेल दि.07 (वार्ताहर)- राहत्या घरामध्ये वाशी येथे कामाला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली एक महिला अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
झरीना अकमल पटेल (वय-35) असे या महिलेचे नाव असून रंग गोरा, उंची 4 फूट 4 इंच, अंगाने मजबूत, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्यावरील केस काळे व लांब, उजव्या हाताला फूलपाखराचे चित्र गोंदलेले मनगटाच्या पाठीमागे, अंगात काळ्या रंगाचा पायजमा व कुर्ती फिक्कट गुलाबी रंगाचा, तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पोलिस हवालदार एस.एम. फाळके यांच्याशी संपर्क साधावा